Monday, June 12, 2006

काही मराठी विनोद. महाराष्ट्रटाईम्सवरून उचललेले. ;)

कुत्रे लग्न का करत नाहीत?

... सिंपल, वो तो वैसे भी कुत्ते की जिंदगी जी रहे हैं!!!

..................................


गुरदीप कौरने चहाच्या दुकानात काम करणाऱ्या संताला विचारलं, 'लिप्टन दी चाह है?'

अंगावरून मोरपीस फिरल्यासारखा हुळहुळा होऊन संता डोळे मिचकावत, आजूबाजूला पाहत लाजत लाजत तिला म्हणाला, 'मैंणुं तो नहीं है, तैणु है तो आ, लिपट जा!!!'
 
 
..................................
 
 
' अरे लहानपणी मी 20व्या मजल्यावरून पडलो होतो खाली,' संताने बंताला सांगितले.

' काय सांगतोस, बापरे, मग वाचला होतास की मेलास? बंताने काळजीने विचारले.

' आठवत नाही यार आता, फार जुनी गोष्ट आहे ही!!!!'
 
..................................
 
 
शर्माजींनी नवी इंडिका घेतली.

तिच्या मागे लिहिलं होतं, 'सावन को आने दो!'

रस्त्यात एका ट्रकने इंडिकाला धडक दिली... त्या ट्रकवर लिहिलं होतं, 'आया सावन झूम के!!!'
 
 
..................................
 
 
ढग फुटला की...
पाऊस पडतो
नारळ फुटला की...
पाणी पडते
प्रेम तुटले की...
अश्रू टपकतात

तुझे डोके फुटले की...
आयला...
 
 
 

काहीच पडत नाही!!!

 

0 Comments:

Post a Comment

<< Home